एकी म्हणती हा आमुचा – संत निळोबाराय अभंग – १८२
एकी म्हणती हा आमुचा सांगाती ।
दुजी म्हणे परती भाऊ माझा ॥१॥
तीजी म्हणे हरि आमुचा मेहुणा ।
चौथी म्हणे पैसुन्या देखणी झणें ॥२॥
एकी म्हणती हा आमुचा गोवळ ।
सहावी म्हणे बाळ नंदाचा कीं ॥३॥
निळा म्हणे जैशा श्रुती विवादती ।
तैशा या भांडती परस्परें ॥४॥