एकी म्हणती हरि आमुचा सोयरा । दुजी म्हणे घरा पुसों जांई ॥१॥ तिजी म्हणे काली आणिला पोसणा । चौथी म्हणे कान्हा यशोदेचा कीं ॥२॥ एकी म्हणे माझा नोवरा साजणी । एकी म्हणे बहिणी पाठीची मी ॥३॥ निळा म्हणे म्हणती आमुचा पिता । एकी म्हणे चुलता सखा माझा ॥४॥