एकी म्हणे हरि आमुचा – संत निळोबाराय अभंग – १८०

एकी म्हणे हरि आमुचा – संत निळोबाराय अभंग – १८०

एकी म्हणे हरि आमुचा शेजारीं ।
दुजी म्हणे मित्र माझा ॥१॥
तिजी म्हणे सखा आमुचा जिवलग ।
चौथी म्हणे नि:संग सदांचा हा ॥२॥
एकी म्हणे कुमारि देऊनि आणिला ।
एकी म्हणे जन्मला यशोदे पोटीं ॥३॥
निळा म्हणे एकमेकां न मिळती ।
पुराणे भांडती तैशापरी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एकी म्हणे हरि आमुचा – संत निळोबाराय अभंग – १८०