संत निळोबाराय अभंग

शुकादिकाचिये ह्रदयीं ध्यान – संत निळोबाराय अभंग – १७९

शुकादिकाचिये ह्रदयीं ध्यान – संत निळोबाराय अभंग – १७९


शुकादिकाचिये ह्रदयीं ध्यान ।
आम्हां जोडलें वो न करितां साधन ।
सहजचि पाचारितां येतसे धांवोन ।
प्रेमें आलिंगितां निवें तनु मन वो ॥१॥
ऐशा गौळणी आनंद भरितां ।
दृष्टीं अवलोकूनि मदनचिया ताता ।
म्हणती धन्या भाग्य आमुचें वो आतां ।
लाधलों जन्म झाली कृताचि कृत्यता वो ॥२॥
नित्य हरीचिया समागमें बाई ।
नाहीं देखिलें तें सुख भोगूं देहीं ।
प्रारब्ध संचित क्रियमाण तेंही ।
गेलें हारपोनिया ॥ ठांईचें ठांई वो ॥३॥
येतां जातां नेणों काळाचा आडदरा ।
देखतां सन्मुख तो पळतुसे माघारा ।
रंग श्रीरंगाचा उमटला शरीरा ।
तेणें वाहातात जन्मदु:ख जीर वो ॥४॥
हरीचे सन्निधीं वो सहवासें वर्ततां ।
यासि बोलतां चालतां कृष्ण खेळतां ।
आंगी ऐश्वर्याचा दृढावली सत्ता ।
तेणें अजरामर झालों असों निभ्रांता वों ॥५॥
ऐशा कृष्णरुपीं रुपसा बाळा ।
होऊनि स्तविती पूजिती वेळोवेळां ।
कडिये खांदिये घेऊनि घननीळा ।
निळया स्वामीतें अवलोकिती डोळां वो ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

शुकादिकाचिये ह्रदयीं ध्यान – संत निळोबाराय अभंग – १७९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *