संत निळोबाराय अभंग

यावरी पुढील कार्यार्थु – संत निळोबाराय अभंग – १५८

यावरी पुढील कार्यार्थु – संत निळोबाराय अभंग – १५८


यावरी पुढील कार्यार्थु ।
साधावया श्रीकृष्णनाथु ।
चालिले राजभुवना आंतु ।
तंव दारवंटा समस्त मल्ल उभे ॥१॥
म्हणती कोठें रे करुनियां मेळ ।
चालिला ते अवघे गोवळ ।
नेणोनियां राजाज्ञा बळ ।
जैसे टोळ सैराट ॥२॥
पाठवा पुढें कृष्ण तोचि ।
आणील परवानगी तो रायाची ।
तंव गोवळ म्हणती रे हें वायाची ।
जल्पतां मराल येचि क्षणीं ॥३॥
परवानगीये एकचि ठावो ।
बळिराम अथवा कृष्णदेवो ।
सांडूनियां कंसरावो ।
रिघा रे शरण वांचाल ॥४॥
तंव तें म्हणती हीं कच्चीं पोरें ।
चणचणा बोलती न्यायनिष्ठुरें ।
भयचि हीं गव्हारें ।
आपटा एकदोनी धरुनियां ॥५॥
त्यांचियां कैवारा कृष्णनाथ ।
येईल आपोआप धांवत ।
मग करुनियां वरवळां समस्त ।
त्यासीहि वधूं निमिषार्धे ॥६॥
निळा म्हणे चिंतुनी ऐसें ।
घांविले गोवळांवरी अति आवेशें ।
तंव ते ओढिले नांगरपाशें ।
बळिरामें एकदांचि कवळिनें ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

यावरी पुढील कार्यार्थु – संत निळोबाराय अभंग – १५८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *