निपुण म्हणती हा – संत निळोबाराय अभंग – १५४

निपुण म्हणती हा – संत निळोबाराय अभंग – १५४


निपुण म्हणती हा आमुचा गुरु ।
ज्ञानी म्हणति हा परात्परु ।
योगी म्हणती योग साचारु ।
याचिपासुनी जन्मला ॥१॥
याज्ञिक म्हणती भासे कृष्ण ।
यज्ञरुपीं हा नारायण ।
वैदिकांही लागले ध्यान ।
म्हणती वेद मूर्तिमत हाचि दिसे ॥२॥
मला भासे वस्ताद जेठी ।
शासन करीतया नृपवर श्रेष्ठीं ।
शस्त्रपाणिया उग्रदृष्टी ।
सहारकर्ताचि कृष्ण दिसे ॥३॥
वृध्दां भासे सकुमार बाळ ।
तरुणांगियां मदनमूर्तिचि केवळ ।
ऐसा सर्वी सर्व हा सकळ ।
भासे जैसिया तैसाचि ॥४॥
कृष्णाकृती भुललीं लोकें ।
जाऊंचि विसरली स्त्रिया बाळकें ।
तंव ते कुब्जा भरुनी तबकें ।
घेऊनि आलीं सुपरिमळें ॥५॥
उत्तम सुवास चंदनगंध ।
केशर कुंकम कस्तुरी शुध्द ।
सुमनहार गुंफिले विविध ।
सुमनतुरे नानापरी ॥६॥
जात होती राजमंदिरां ।
तंव त्या देखिलें नंदकुमरा ।
म्हणे आजींचि हे पूजा सुंदरा ।
चर्चूं श्रीकृष्णा निजहस्तें ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

निपुण म्हणती हा – संत निळोबाराय अभंग – १५४