आले संन्यासी तापसी ।
योगी मुनिजन प्रांतवासी ।
पंडित पुराणिक ज्योतिषी ।
वेदाभ्यासी याज्ञिक ॥१॥
श्स्त्रपाणि रिक्तपाणी ।
पहाति कृष्णातें ते दुरुनी ।
अवलोकूनियां निज नयनीं ।
परम विस्मयातें पावती ॥२॥
घरें सांडूनियां नारी ।
आल्या कोणीचि नसतां घरी ।
म्हणती सवेंचि जाईल गे श्रीहरी ।
आम्ही त्या दृष्टीं न देखतां ॥३॥
मग जे उव्दिग्न व्हावें मनीं ।
तें आतांच कां न यावें पाहोनी ।
ऐशिया निश्रचयातें करुनी ।
आलिया एकांतवासीहि त्या ॥४॥
जिया बाहेरी येणेंचि नाहीं ।
आपुलिया सभाग्यपणें कदाही ।
आल्या धांवोनियां त्याहीं कृष्णा दृष्टी अवलोकूं ॥५॥
निळा म्हणे घरा भाग्य ।
आलिया अव्हेरी कोण त्या मग ।
अधिकाअधीक लाहो सवेग ।
करुनियां संग्रहिती ॥६॥