संत निळोबाराय अभंग

चिरें आणूनियां वेंष्टलें – संत निळोबाराय अभंग – १५०

चिरें आणूनियां वेंष्टलें – संत निळोबाराय अभंग – १५०


चिरें आणूनियां वेंष्टलें ।
गोवळ अवघेचि शृंगारले ।
येरेयेरां म्हणती भले ।
गौरव घ्या रे मामाचा ॥१॥
चिरें गुंडिती माजेसी ।
उंच पटके ते पायासी ।
झगे वेष्टूनियां शिरासी ।
विजारा टाकिती खांदयावरी ॥२॥
ऐसे शृंगारिले गोवळ ।
पुढें चालिले भार सकळ ।
तंव ते धनुरयागींचे वीर प्रबळ ।
घ्या घ्या म्हणोनी धांविले ॥३॥
कृष्णें बळरामें देखिलें ।
अवघ्यांपुढे मग ते झाले ।
धनुर्धारी वेग केले ।
परि तें न चले बळ त्यांचे ॥४॥
घ्या घ्या म्हणोनी हांका देती ।
शंकस्फुरणें ठाईंचि करिती ।
परी ते गोवळची समस्तीं ।
वेष्टूनियां घेतले ॥५॥
धनुष्या लाऊनि बाण ।
विंधावे तों माजि शिरोन ।
गोवळीं घेतली ते हिरोन ।
आणि मोडुनी सांडिली ॥६॥
निळा म्हणे एक एका ।
नपुरतीची युध्द तबका ॥
निपातिले फेडिली शंका ।
आणि पुढें संचरले ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

चिरें आणूनियां वेंष्टलें – संत निळोबाराय अभंग – १५०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *