धन्य काळ आजिचा दिवस – संत निळोबाराय अभंग – 1462

धन्य काळ आजिचा दिवस । हरिचे दास भेटले ॥१॥

दंडवत घालीन पायां । करीन काया कुरवंडी ॥२॥

पाप ताप दैन्य गेलें । येथुनी पाउलें देखतां ॥३॥

निळा म्हणे पावलों फळ । केलिया निर्मळ सुकृतातें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.