मग लेइले दिव्य – संत निळोबाराय अभंग – १४६

मग लेइले दिव्य – संत निळोबाराय अभंग – १४६


मग लेइले दिव्य अळंकार ।
उभयतांहि बंधु अति नागर ।
मुगुट कुंडले एकावळी हार ।
झळकती पदकें जडितांची ॥१॥
बाहूभूषणें वीरकंकणें ।
मुद्रिका अंगुळिया शोभल्या लेणें ।
वेष्टुनी पितांबराची परिधानें ।
घेतली निशाणें निजकरीं ॥२॥
आधींचि मदनाचे हे बाप ।
दिव्य तेज प्रभा अमून ।
सकळहीं लावण्य सांटोप ।
धरुनियां आली निज वस्ती ॥३॥
अवघें चि सुख मुसावलें ।
कृष्णाकृति तें वोतलें नयना पाहुणेर देऊं आलें ।
जे जे देखती तयाच्या ॥४॥
कृष्ण लावण्याची मूर्ती ।
बळिदेवही तैसीचि आकृती ।
ठाणे माणें समान दिप्ती ।
प्रतापकीर्ति यशवंत ॥५॥
दंडी मुडपी विराजमान ।
शोभले राजीवलोचन ।
पाहों येती नागरिकजन ।
निळा म्हणे तया रामकृष्णासी ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मग लेइले दिव्य – संत निळोबाराय अभंग – १४६