ऐसा संतांच उपकार – संत निळोबाराय अभंग – 1457
ऐसा संतांच उपकार । काय मी पमार आठवूं ॥१॥
करुनियां अनुमोदन । दिधलें वचन अभयाचें ॥२॥
म्हणती करीं नामपाठ ॥ न करीं खटपट यावीण ॥३॥
निळा म्हणे कृपावंत । करिल सनाथ श्रीहरी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.