उत्तीर्ण त्यांचे काय व्हावें – संत निळोबाराय अभंग – १४५४

उत्तीर्ण त्यांचे काय व्हावें – संत निळोबाराय अभंग – १४५४

उत्तीर्ण त्यांचे काय व्हावें ।
न कळे भावें वंदितों ॥१॥
जीव पायीं ठेवूं म्हणे ।
लटिकेपणें तो मिथ्या ॥२॥
देह मांस चर्म हाडें ।
अर्पिता अपाडें नैश्वर तीं ॥३॥
निळा म्हणे चरणीं माथा ।
ठेवूं आतां संतांचिये ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उत्तीर्ण त्यांचे काय व्हावें – संत निळोबाराय अभंग – १४५४