उपायाच्या करितां श्रेणी – संत निळोबाराय अभंग – १४५३
उपायाच्या करितां श्रेणी ।
परि जेथ कोणी न पवेचि ॥१॥
तया पावविलों ठायां ।
संतीं करुनियां निज कृपा ॥२॥
ज्याचे प्राप्ती लागीं योगी ।
धांवती मागीं सुषुम्नेच्या ॥३॥
निळा म्हणे सिध्द मुनीं ।
ज्यांतें अनुदिनीं चिंतिती ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.