अवघ्याचि संपत्ती आलीया घरा – संत निळोबाराय अभंग – १४५१

अवघ्याचि संपत्ती आलीया घरा – संत निळोबाराय अभंग – १४५१

अवघ्याचि संपत्ती आलीया घरा ।
तुमचिया दातारा आगमनें ॥१॥
शीतळ झालों पावन झालों ।
तुमचिया लागलों चरणांसी ॥२॥
धरिलीया जन्माचें सार्थक झालें ।
तुम्हीं अवलोकिलें म्हणोनियां ॥३॥
निळा म्हणे धरिलें हातीं ।
जेव्हांचि संतीं तुम्हीं मज ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अवघ्याचि संपत्ती आलीया घरा – संत निळोबाराय अभंग – १४५१