निरवूनियां विठ्ठल देवा – संत निळोबाराय अभंग – १४४७

निरवूनियां विठ्ठल देवा – संत निळोबाराय अभंग – १४४७

निरवूनियां विठ्ठल देवा ।
हातीं धरावा मज आतां ॥१॥
तुमचिया भिडा अंगिकार ।
करील साचार तत्क्ष्णी ॥२॥
जरी मी अन्यायी अपराधी ।
तरी कृपानिधी तुम्ही संत ॥३॥
निळा म्हणे विनऊं काय ।
तुम्ही मायबाप अपत्य मी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

निरवूनियां विठ्ठल देवा – संत निळोबाराय अभंग – १४४७