विनंती माझी एकीं ऐका – संत निळोबाराय अभंग – १४४५

विनंती माझी एकीं ऐका – संत निळोबाराय अभंग – १४४५


विनंती माझी एकीं ऐका ।
अहो पुंडलिका महामुनी ॥१॥
ठाव दयावा चरणांपाशीं ।
मज विठोबासी विनवुनी ॥२॥
अंगिकारा रंका दीना ।
विज्ञापना हे माझी ॥३॥
निळा म्हणे सांभाळावें ।
मज हें दयावें वरदान ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विनंती माझी एकीं ऐका – संत निळोबाराय अभंग – १४४५