चातुर्य मिरवी – संत निळोबाराय अभंग – १४४१

चातुर्य मिरवी – संत निळोबाराय अभंग – १४४१

चातुर्य मिरवी ।
कळा व्युत्पत्ति दाखवी ॥१॥
परी तें अवघें वांयां गेलें ।
एका न भजतां विठठलें ॥२॥
गायनाची कळा ।
आसनें मुद्रेचा सोहळा ॥३॥
निळा म्हणे जें जें करी ।
सोंगींचि तें तें अवघें वरी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

चातुर्य मिरवी – संत निळोबाराय अभंग – १४४१