घेऊनियां कृत्रिम सोंगे ।
नानापरींच्या नटती रंगें ॥१॥
आपण बुडवीती ।
लाउनि आणिकांही संगती ॥२॥
जाउनि एकांतीं बैसणें ।
करुनी चावटी बोलणें ॥३॥
निळा म्हणे उपदेशिती ।
विषय आत्मरुप शिष्याप्रती ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.