संत निळोबाराय अभंग

म्हणती नको नको – संत निळोबाराय अभंग – १४४

म्हणती नको नको – संत निळोबाराय अभंग – १४४


म्हणती नको नको जाऊं हरी ।
सांडोनी आम्हां कोठें दुरी ।
तुजवांचोनिया संसारी ।
कोण आम्हां जिवलग ॥१॥
जातील प्राण तुतें जातां ।
वियोग न साहावे तें व्यथा ।
पळमात्रचि वेंगळे पडतां ।
जेविं कां मासोळी जळांतील ॥२॥
नव्हे अक्रूर झाढीवर ।
करुं आला येथें संहार ।
जीवन नेलिया यदुवीर ।
आम्हां सहजचि प्राणांतु ॥३॥
इतुक्यांचिही येईल हत्या ।
जरि तू कृष्णा नसील आतां ।
ऐसे बोलोनियां समस्ता ।
लोळती कृष्णचरणावरीं ॥४॥
वधुनी आम्हां आपुल्या हातें ।
जाई मग तूं जाणें तेथें ।
करुनियां दीर्घ् रुदनातें ।
उकसाबुकसी स्फुंदती ॥५॥
आमुचा जीव तूंचि प्राण ।
तुजविण न वाचों तुझीचि आण ।
नको आमुचें हें निर्वाण ।
पाहों आपुले निज नेत्रीं ॥६॥
निळा म्हणे यावरी हरी ।
शांतवी तया निज उत्तरीं ।
म्हणें आम्ही वरावरी ।
येऊं भेटोनी मामासी ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

म्हणती नको नको – संत निळोबाराय अभंग – १४४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *