न राहेचि क्षणहि भरी ।
कदा निश्चळ अंतरी ॥१॥
वाचाळ धोवे तैसें ।
कार्येविण निरुददेशें ॥२॥
करी बोलतां प्रमाद ।
वाढवुनि वादावाद ॥३॥
निळा म्हणे महा मूर्ख ।
करी सकळां सर्वे दु:ख ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.