नेणोनियां आत्महित – संत निळोबाराय अभंग – १४३८
नेणोनियां आत्महित ।
करिती घात अभिमानी ॥१॥
नसतीच वाढवूनियां उपाधी ।
पडती मधीं संदेहा ॥२॥
नाठवूनियां विठ्ठल देवा ।
करिती सेवा भूतांची ॥३॥
निळा म्हणे जन्मोनि गेला ।
वृथाचि पडिला निरयांत ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.