नेणे आपुल्या हितावरी ।
बोले त्यांसीचि विरुध्द करी ॥१॥
जाणावा तो जन्मांतर ।
पूर्व दोषाचा विकार ॥२॥
सर्व काळ अल्प बुध्दी ।
नेणे बोलों सभासंधी ॥३॥
निळा म्हणे तया दिसे ।
अवघें जगचि वेडें ऐसें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.