निर्भीड बोलणें ।
ज्याचें अपस्वार्थी जिणें ॥१॥
त्याचिये संगतीचे फळ ।
होय चित्तसी खळबळ ॥२॥
परदु:ख नेणतां ।
कर परान्नें पुष्टता ॥३॥
निळा म्हणे दावी सोंग ।
ऐसा त्यजावा मातंग ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.