तत्वतां न कळे – संत निळोबाराय अभंग – १४३५

तत्वतां न कळे – संत निळोबाराय अभंग – १४३५

तत्वतां न कळे ।
आलें मना तें चावळे ॥१॥
खरियासी मानी खोटें ।
खोटें खया ऐसें वाटे ॥२॥
अंध न देखे निवाडू ।
तम तैसा हाचि उजिवडू ॥३॥
निळा म्हणे बुध्दिमळीन ।
नेणें पाप कीं हें पुण्य ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तत्वतां न कळे – संत निळोबाराय अभंग – १४३५