प्रत्यक्ष जनीं जनार्दन – संत निळोबाराय अभंग – १४३१
प्रत्यक्ष जनीं जनार्दन ।
नूणोनियां कथी ज्ञान ॥१॥
काय तैसी ते वाचाळें ।
करिती चावटी तोंडबळें ॥२॥
नाहीं अंगी हरिची भक्ति ।
दाविती कोरडीच विरक्ति ॥३॥
निळा म्हणे नेणतां वर्म केलें पाठी लागे कर्म ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.