आतां अभक्त कातर ।
मळिन जयाचें अंतर ॥१॥
दाऊनियां वरदळ वेष ।
मना अंगी आशापाश ॥२॥
वाचे सात्विक बोलणें ।
विषयीं वासनेचें ठाणें ॥३॥
निळा म्हणे घेउनी सोंगें ।
निरवे चार करीत उगे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.