आणिकांते उपदेशी – संत निळोबाराय अभंग – १४२६
आणिकांते उपदेशी ।
आपण मळिन मानसीं ॥१॥
बोले ते ते धूर्त वादें द लटिक्याचि प्रेमें रडे स्फुंदे ॥२॥
सोंग परमार्थ हा सार ।
आशा अंतरी विखार ॥३॥
निळा म्हणे देहाभिमानें ।
गेलीं भोगिती ते पतनें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.