अंधकारीं प्रकाश दावी – संत निळोबाराय अभंग – १४२५

अंधकारीं प्रकाश दावी – संत निळोबाराय अभंग – १४२५

अंधकारीं प्रकाश दावी ।
दिप रवीपुढें मिथ्या ॥१॥
तैशीं प्राप्तापुढें ज्ञानें ।
युक्तिचीं दिनें लेवासे ॥२॥
जिवे मेवे गोडिये निके ।
परि ते फिके परमामृतीं ॥३॥
निळा म्हणे दाविती भाव ।
परि ते स्वमेव संत भिन्न ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अंधकारीं प्रकाश दावी – संत निळोबाराय अभंग – १४२५