हरीच्या भजनें हरीचे भक्त हरीचे भक्त – संत निळोबाराय अभंग – १४२२

हरीच्या भजनें हरीचे भक्त हरीचे भक्त – संत निळोबाराय अभंग – १४२२

हरीच्या भजनें हरीचे भक्त हरीचे भक्त ।
झाले विख्यात भूमंडळीं ॥१॥
तरोनि आपण तारिले आणिका ।
वैकुंठनायका प्रिय झाले ॥२॥
ज्यांचे ध्यानी मनीं हरी ।
राहिला निरंतरीं दृष्टीपुढें ॥३॥
निळा म्हणे अवघेचि सांग ।
केले उभय भोग भोगुनियां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

हरीच्या भजनें हरीचे भक्त हरीचे भक्त – संत निळोबाराय अभंग – १४२२