हरीच्या नामें हरीचे दास जाले ।
सकळिकांस वंदय जगीं ॥१॥
समोर त्याच्या नये काळ ।
कळिचा अमंगल म्हणउनी ॥२॥
वदनीं त्यांच्या निघता घोष ।
पळती दोष इतरांचे ॥३॥
निळा म्हणे केली वाट ।
सोपी वैकुंठप्राप्तीची ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.