होऊनियां तेचि राहिले निवांत – संत निळोबाराय अभंग – १४१८
होऊनियां तेचि राहिले निवांत ।
रुपीं अखंडित होउनी संत ॥१॥
नित्य निरामय अखंड अव्दय ।
ध्याती देवत्रय ज्यातें सदा ॥२॥
येकविसा स्वार्गातें कवळुनी राहिलें ।
सूर्या प्रकाशिेलें जेणें तेजें ॥३॥
निळा म्हणे कृपा करुनिया सद्गुरु ।
देती अभयकरु त्यासी फावे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.