माझें माझे हातीं हीत ।
दिधलें संतमुनिश्वरीं ॥१॥
काय उत्तीर्ण होऊं कैसा ।
उपकारें आकाशा झांकोळिलें ॥२॥
जिहीं पाजीलें अमृत धणीं ।
तयां कांजवणी काय देऊं ॥३॥
निळा म्हणे रत्पपालटा ।
सागरगोटा काय तुके ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.