येकायेक पण – संत निळोबाराय अभंग – १४१४
येकायेक पण ।
नसंपडे दुजेंनविण ॥१॥
म्हणोनियां भक्त केला ।
आधीं मग देव जाहला ॥२॥
फुला आधीं फळ ।
नव्हेचि मुळेंविण डाळ ॥३॥
निळा म्हणे लेंक ।
होतां बापपणा बिक ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.