संतभेटीचें आरत – संत निळोबाराय अभंग – १४०९
संतभेटीचें आरत ।
उभाचि राहिला तिष्ठत ॥१॥
बापकृपाळु श्रीहरी ।
वाट पाहे निरंतरीं ॥२॥
धांव घालूनियां पुढें ।
आलिंगी त्या वाडेंकोडें ॥३॥
निळा म्हणे नवाची नित्य ।
सोहळा भक्तांचा करित ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.