हेंचि त्यांचे नित्य काम – संत निळोबाराय अभंग – १४०८
हेंचि त्यांचे नित्य काम ।
दावणें धर्म विहिताचे ॥१॥
ज्याचें तया स्वहित जोडें ।
ऐसें उघडें बोलती ॥२॥
नि:सीम पांडुरंगी भक्ति ।
उपजे विरक्ति भाविकां ॥३॥
निळा म्हणे ऐसी वाणी ।
वदती पुराणीं प्रतिपादय ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.