हरिभक्तीच्या जाणोनी नीति – संत निळोबाराय अभंग – १४०७
हरिभक्तीच्या जाणोनी नीति ।
त्याचि उपदेशिती भाविकां ॥१॥
पडो नेदिती अडचणी गोवा ।
जातां देवा भेटिसी ॥२॥
बैसवूनियां सुखासनीं ।
पावविती धमीं वैकुंठा ॥३॥
निळा म्हणे देऊनी संग ।
ठेविता अभंग हरिपदीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.