हरीच्या पढोनियां नामावळी – संत निळोबाराय अभंग – १४०५
हरीच्या पढोनियां नामावळी ।
करिती होळी महादोषा ॥१॥
तेचि धन्य देहधारी ।
या माझारीं कलियुगा ॥२॥
सत्य वाणी सत्याचि क्रिया ।
जे आचरोनियां वर्तती ॥३॥
निळा म्हणे त्यांचिया संगें ।
उध्दरिजे जगें अनायासें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.