संतांपाशी अपार सुख – संत निळोबाराय अभंग – १४०१

संतांपाशी अपार सुख – संत निळोबाराय अभंग – १४०१

संतांपाशी अपार सुख ।
हरिखा हरिख वोसंडे ॥१॥
बोलती वचनें तेचि वेद ।
शास्त्रानुवाद विहिताचे ॥२॥
पुरातन ज्या ज्या उत्तम वाटा ।
दाविती चोखटां भाविकां ॥३॥
निळा म्हणे यांचा धंदा ।
हाचि सर्वदा गुण वाणी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संतांपाशी अपार सुख – संत निळोबाराय अभंग – १४०१