संत निळोबाराय अभंग

घुमघुमिती मोहर्‍या नादें – संत निळोबाराय अभंग १४

घुमघुमिती मोहर्‍या नादें – संत निळोबाराय अभंग १४

घुमघुमिती मोहर्‍या नादें ।
पांवे छंदें वाजविती ॥१॥
शिंगें काहाळा गजर झाला ।
श्रीहरि शोभला समुदायें ॥२॥
अंगी चंदन बाणली उटी ।
कास ते गोमटी पितांबरें ॥३॥
निळा म्हणे केशर भाळीं ।
तेज बंबाळी मुगुटाचें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

घुमघुमिती मोहर्‍या नादें – संत निळोबाराय अभंग १४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *