संत निळोबाराय अभंग

कृष्ण बळियामाजि – संत निळोबाराय अभंग – १३९

कृष्ण बळियामाजि – संत निळोबाराय अभंग – १३९


कृष्ण बळियामाजि बलिष्ट ।
कृष्ण अवघियां देवां श्रेष्ठ ।
तैसाचि बळिरामही उध्दट ।
भरील घोट देखतां ॥१॥
एक नवनागसहस्त्रबळीं ।
दुजा तंव ते कल्पांत शुळी ।
येतांचि येथें निमिष मेळीं ।
करितील संहार कंसाचा ॥२॥
कृष्ण परमात्मा ईश्वर ।
अनंतकोटीब्रम्हांडधर ।
मायानियंता परात्पर ।
तया हा पामर आणवितो ॥३॥
पतंगा वडवानळेसीं खेळणें ।
दर्दुर शेंषातें गिळूं म्हणे ।
उलुकें रवितें संघटणें ।
केंवि जीवे प्राणी वांचिजेल ॥४॥
तैसिचि परी झाली यातें ।
जेंवि खदयोत झगटूं पाहे रवितें ।
अरण्यमृगें शार्दूलातें ।
कैसेनि भेटीसी आणिजे ॥५॥
परी येथें प्रारब्धचि बळी ।
घडवील घडावें तें तत्काळीं ।
पहा त्या हिरण्यकश्यपें आपुलियेचि नळीं ।
बसविला नृसिंह पाचारुनी ॥६॥
निळा म्हणे होणार होईल ।
बुध्दीही तैसीच प्रवर्तवील ।
क्रियाहि शरीरीं उमटेल ।
भोगणें भोगवील प्राचीन ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कृष्ण बळियामाजि – संत निळोबाराय अभंग – १३९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *