संत निळोबाराय अभंग

एका नामें बहुत तरले – संत निळोबाराय अभंग – १३८६

एका नामें बहुत तरले – संत निळोबाराय अभंग – १३८६


एका नामें बहुत तरले ।
एका भावें जे अनुसरले ।
एका तुमतेचि ते पावले ।
एकाएकीं गोविंदा ॥१॥
एका जाणोनियां तुमतें ।
एका रुसले अहंकारातें ।
एका विसरोनियां संसारातें ।
एका सुखातें पावले ॥२॥
एका तुमच्या निजध्यासें ।
एकाचि तुमच्या नामघोषें ।
एका तुमच्या कृपालेशें ।
आपणा ऐसे तुम्ही केलें ॥३॥
एका तुमच्या कीर्तनमेळें ।
एका तुमच्या भावबळें ।
एकाएकींचि उठोनि पळे ।
पाप सगळें गोविंदा ॥४॥
निळा म्हणे एकाएकीं ।
स्मरणमात्रेंचि झाले सुखी ।
एका नामोच्चारें मुखीं ।
वैकुंठलोकीं बैसविलें ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एका नामें बहुत तरले – संत निळोबाराय अभंग – १३८६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *