एकनिष्ठ झाला भाव – संत निळोबाराय अभंग – १३८४
एकनिष्ठ झाला भाव ।
आतां देवा तेचि अंगे ॥१॥
व्दंव्दे त्याचीं करिती काई ।
सर्वांठायीं देव तयां ॥२॥
ध्यानीं मनीं जनीं वनीं ।
प्रगटे लोचनीं अहोरात्र ॥३॥
निळा म्हणे वियोगवार्ता ।
नेणती सर्वथा हरिभक्त ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.