एक एका अवलोकिती – संत निळोबाराय अभंग – १३८१

एक एका अवलोकिती – संत निळोबाराय अभंग – १३८१


एक एका अवलोकिती ।
एक मिसळती एकांत ॥१॥
संत तेचि झाले देव ।
संती देव विराजे ॥२॥
येरयेरां मिठी पडे ।
आतां निवडे तें कैसें ॥३॥
निळा म्हणे भक्ति सुखें ।
झाले सारखे उभयतां ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एक एका अवलोकिती – संत निळोबाराय अभंग – १३८१