संत निळोबाराय अभंग

म्हणती पाठवावा अक्रूर – संत निळोबाराय अभंग – १३८

म्हणती पाठवावा अक्रूर – संत निळोबाराय अभंग – १३८


म्हणती पाठवावा अक्रूर ।
कृष्णीं त्याचा मित्राचार ।
त्याचें नुलंघी तो उत्तर ।
सहसा प्राण गेलिया ॥१॥
देऊनियां उत्तम रथ ।
मूळ पाठवावा तो त्वरित ।
सांगावें भेटीसी उदयत ।
मामा तुझे कंसरावो ॥२॥
अक्रूरा सांगावा हाचि अर्थ ।
जरी तूं नाणिसी कृष्ण येथ ।
तरी मम हस्तें तुझा घात ।
होईल जाण तेंच क्षणीं ॥३॥
रायें अक्रर पाचारिला ।
रथ देऊनियां गौरविला ।
म्हणे जाऊनियां आतां वहिला ।
भाचा आणीं भेटीसी ॥४॥
तयालागीं प्राण फुटे ।
घटिकां पळहि निमिष न लोटे ।
नणिता लावीन मृत्युवाटें ।
तुज हें निर्धारें जाण पां ॥५॥
आजींचि घेऊनियां तूं येसी ।
जरी कां आपुल्या निजमित्रासी ।
तरि देऊनियां निज भाग्यासी ।
गौरवीन तुज बहुमानें ॥६॥
निळा म्हणे अक्रूर मनीं ।
म्हणे हा पापी पापियाहुनी ।
आणवितो कृष्ण निदानीं ।
आपुलिया प्राणा घातावया ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

म्हणती पाठवावा अक्रूर – संत निळोबाराय अभंग – १३८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *