उदार संत उदार संत – संत निळोबाराय अभंग – १३७९
उदार संत उदार संत ।
जया तैसा हेत पुरविती ॥१॥
अपार देणें अपार देणें ।
पावती पेणें वैकुंठीचें ॥२॥
न सरे ऐसें न सरे ऐसें ।
देती सहवासे निजात्मसुख ॥३॥
निळा म्हणे यांचिये पायीं ।
निज वस्ती देंई देवा मज ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.