याचिलागीं परांगना – संत निळोबाराय अभंग – १३७४

याचिलागीं परांगना – संत निळोबाराय अभंग – १३७४

याचिलागीं परांगना ।
मानिती हुताशनापरी ज्ञाते ॥१॥
जवळी गेल्या जाळूं शके ।
म्हणोनि धाकें पळती त्या ॥२॥
आधीं तों न करिती संभाषण ।
मी एकांतदर्शन कैचें त्यां ॥३॥
निळा म्हणे शुचिर्भूत ।
वसती निर्धूत जनीं वनीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

याचिलागीं परांगना – संत निळोबाराय अभंग – १३७४