मृत प्राणी ते जीवविले – संत निळोबाराय अभंग – १३७३

मृत प्राणी ते जीवविले – संत निळोबाराय अभंग – १३७३

मृत प्राणी ते जीवविले ।
पुरुषहीं केले स्त्रियांचे ॥१॥
हे तों तुमची सहजस्थिती ।
लोकांसी भक्ति प्रगटावया ॥२॥
प्रसादेंचि विधवेसी बाळ ।
जन्मविला केवळ भातलवंडा ॥३॥
निळा म्हणे तुमची करणी ।
देवाहुनी अधिक् ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मृत प्राणी ते जीवविले – संत निळोबाराय अभंग – १३७३