मार्ग दाउनी गेले आधीं ।
दयानिधी संत पुढें ॥१॥
तेणेंचि पंथें चालोंजातां ।
न पडे गुंता कोठें कांहीं ॥२॥
मोडूनियां नाना मतें ।
देती सिध्दांते सौरसु ॥३॥
निळा म्हणे ऐसे संत ।
कृपावंत सुखसिंधु ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.