मानामान संकल्प आशा – संत निळोबाराय अभंग – १३७०

मानामान संकल्प आशा – संत निळोबाराय अभंग – १३७०

मानामान संकल्प आशा ।
तुटला मोहजाळ फांसा ॥१॥
तया गुरुचियां भक्तां ।
नुरेचि कोठें गोंवा गुतां ॥२॥
संर्वातरीं आपुलें रुप ।
देखती नेणतां विकल्प ॥३॥
निळा म्हणे कर्मातीत ।
झाले होऊनि कर्मी रत ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मानामान संकल्प आशा – संत निळोबाराय अभंग – १३७०