मस्तक माझा पायांवरी ।
राहो निरंतरी संतांच्या ॥१॥
इतुलेन मी कृतकृत्य ।
होईन निश्चित संसारीं ॥२॥
धरिल्या जन्माचें सार्थक ।
भवभयमोचक साधन हें ॥३॥
निळा म्हणे नलगे फार ।
करणें विचार यावरी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.